About

प्रत्येक व्यक्तीच्या विकासात मग तो शैक्षणिक ,व्यावसायिक ,सामाजिक,अध्यात्मिक.या प्रगतीत कोणी ना कोणी योग्य दिशा दाखविणारे ,योग्य मार्ग निर्देशक करणारे विभुती असतात.अशा विभुती खरतर बोटाला धरून किंबहुना आपले पांडित्य सांगून मी कसा थोर आहे याचा देखावा करत नाही त्यांच्या कर्तुत्वाने,दातुत्वाने आणि त्यांच्या सहवासातून आम्ही कसे घडत गेलो हे प्रेरीत करतात आणि समाजाला दिशा देत राहतात.

                      मला अभिमान आहे कि मी ज्या संस्थेचा घटक आहे त्याची पायमुळे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या अथक आणि निस्वार्थ प्रेरणेने दऱ्या-खो-यातील आदिवासी कुटुंबाच्या कल्याणासाठी रुजलेले आहे.महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा गुरुकुल पद्धतीने साकारण्याची संकल्पना ही दादासाहेबांची .

                         माझ्या सिद्धेश्वर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुळे ता.कळवण,जि.नाशिक निसर्गरम्य परिसरात वसलेली शाळांमध्ये इयता १ ली ते ११ वी चे वर्ग आणि ५१४ विद्यार्थी आणि २५ कर्मचारी गुरुकुलात आहे.विद्यार्थ्यांच्या भावविश्वात पदार्पण करून त्यांच्यातील सुप्त गुणांचा अविष्कार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना पारंपारिक शैक्षणिक आंतरक्रियेतुन घडणारा विद्यार्थी व एकविसाव्या शतकातील कौशल्य प्राप्त विद्यार्थी घडविण्यासाठी  माझ्या संस्थेने इयत्ता सहावी ते इयत्ता दहावी तील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना Computer Course,Mobile  Repairing, Electric Fitting  आणि Fashion Design  चे प्रशिक्षण दिले जाते .आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मोठ्या उत्साहाने करीत आहोत आणि करत राहणार.